|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तोफेची चोरी झालीच होती

तोफेची चोरी झालीच होती 

पन्हाळा :

पन्हाळगडावरील पंचायत समितीच्या लागूनच असलेल्या शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळय़ासमोर गायब झालेली शिवकालीन तोफ पुन्हा मूळ जागेवर दाखल झाली. येथील तोफ मूळ जागेवर नव्हती.  काही अज्ञातांकडून हलविण्यात आली होती. त्यामुळे पंचायत समितीच्या आवारातील तोफ चोरीला गेल्याची चर्चा  शिवप्रेमी व पन्हाळावासियांत सुरु होती. सध्या ही तोफ तिच्या मूळ जागेत ठेवण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी पन्हाळगडावरील पंचायत समिती जवळील तोफ चोरीला गेल्याचे वृत्त ‘प्रसिद्ध झाले. यानंतर तोफेबाबत चर्चा व शोध सुरु झाला. गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांना याबाबत विचारणा केली असता पंचायत समितीच्या आवारात तोफ नव्हतीच असा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, तोफेची चोरी उघड होणार या भीतीने अज्ञातांनी तोफ झुडुपात आणून टाकली.  सकाळी शिवप्रेमींनी ती पाहिल्यानंतर मूळ जागेवर बसवली. यामुळे ‘तोफ चोरीला गेल्याचे वृत्त खरे ठरले आहे.

 तोफ माजी सभापती भारत पाटील यांनी पंचायत समितीच्या प्रांगणात ठेवली होती. मात्र, त्यानंतर काही वरि÷ अधिकाऱयांनी ही तोफ लागूनच असलेल्या महाराजांच्या अर्थपुतळय़ासमोर नेली असल्याचे पंचायत समितीच्या काही कर्मचाऱयांचे व जाणकार लोकांचे म्हणणे आहे. गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी पंचायत समितीच्या आवारात तोफ बसविण्यात आलीच नव्हती. त्यामुळे या तोफेचा आणि पंचायत समितीचा काही संबंध येत नसल्याचा खुलासा दिला आहे. त्यामुळे नेमकी तोफेबाबतची माहिती कोणाला आहे, कोण खरे व कोण खोटे हे कसे समजायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.