|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रतिमहिना सिलिंडर दरवाढीचा निर्णय मागे

प्रतिमहिना सिलिंडर दरवाढीचा निर्णय मागे 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

दर महिन्याला एलपीजी सिलिंडरचे दर वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने अखेर मागे घेतला आहे. याआधी केंद्राने दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सदर निर्णय उज्ज्वला योजनेच्या विपरीत असल्याची जाणीव सरकारला झाल्यामुळेच निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून गुरुवारी देण्यात आली. केंद्र सरकारकडून हा निर्णय मागे घेण्यात आल्याने देशभरातील गॅसधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून 2016 पासून केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना सिलिंडर दरात महिन्याला 4 रुपये दरवाढ करण्याचे निर्देश दिले होते. गॅस सिलिंडरवरील अनुदान रद्द करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता.