|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » ‘एपिरॉक’ची खाणकाम, पायाभूत क्षेत्रांना सेवा

‘एपिरॉक’ची खाणकाम, पायाभूत क्षेत्रांना सेवा 

 पुणे / प्रतिनिधी :

एपिरॉक या उपकंपनीने एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याचे आणि ग्राहकांना खाणकाम, पायाभूत सुविधा व नैसर्गिक संसाधने या क्षेत्रांतील आघाडीची उत्पादने व सेवा ग्राहकांना देण्यास सुरुवात केल्याचे ऍटलास कॉपको या स्वीडिश औद्योगिक कंपनीने जाहीर केले आहे.

ऍटलास कॉपको व एपिरॉक यांचे व्यवसायाचे मार्ग भिन्न असतील. पण सर्व ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने त्यांचा नावीन्य व बांधिलकीचा वारसा एकच असेल. ऍटलास कॉपकोची ‘कामगिरीमध्ये एकता व नावीन्याने प्रेरित’ ही 144 वर्षांची परंपरा एपिरॉक कायम ठेवणार आहे. कंपनी भारतातील खाणकाम क्षेत्राला नावीन्यपूर्ण व सक्षम स्थानिक ग्राहक सेवेमार्फत अत्यंत उत्पादक उपकरणे देणार आहे. एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जेरी अँडरसन म्हणाले, आम्ही नव्या बिझनेस एंटिटीविषयी आनंदी असून खाणकाम व सिव्हिल इंजिनीअरिंग उपकरणे या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी उत्सुक आहोत. ‘एपिरॉक’ अर्गोनॉमिक उत्पादने व सेवा देणार असून, त्यामुळे आमच्या ग्राहकांना उत्पादकता, ऊर्जाक्षमता व सुरक्षितता यामध्ये वाढ करण्यासाठी मदत होईल.

एपिरॉकचे अद्ययावत कारखाने नाशिक व हैदराबाद येथे असून बेंगळूर येथे जागतिक दर्जाचे इंजिनीअरिंग केंद्र आहे. देशभर कंपनीची विक्री व प्रादेशिक कार्यालये आहेत. एपिरॉक इंडियाचे भारतात हजारांवर कर्मचारी आहेत.

Related posts: