|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राजवाडा परिसर मोकळा श्वास केव्हा घेणार

राजवाडा परिसर मोकळा श्वास केव्हा घेणार 

मुख्याधिकारी गोरे यांची निर्णय क्षमता अडकली कशात

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयात मुख्य ठिकाण म्हणून राजवाडा परिसराला ओळखले जाते. या परिसराला अलिकडच्या काही दिवसात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. चाँदणी चौक ते राजवाडा परिसरातील प्रतापसिंह हायस्कूलच्या समोरही फळ विक्रेते बसतात. अक्षरशः या परिसराचा श्वासच कोंडला आहे. सातारकर ना दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत. मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांची निर्णय क्षमता अडकली कशात, असाही सवाल उपस्थित होत आहे.

मनोमिलनाच्या काळात सुमारे पाच वर्षापूवी शहरात जोरदारपणे अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली होती. त्यामध्ये राजवाडा परिसरातील सगळे हातगाडे आणि फळविक्रेते हटवण्यात आले होते. राजवाडा परिसराने मोकळा श्वास घेतला होता. यावेळी पालिकेच्या अधिकाऱयांना आणि तात्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही मंडळींना शिव्यांची लाखोलीही वाहिली होती. काही अधिकारी व्यावसायिकांचा पवित्रा पाहुन गुलाड झाले होते. बघता बघता काही दिवसात पुन्हा जैसे तेच परिस्थितीच निर्माण झाली आहे. अगदी राजवाडा बसस्थानकात काही हातगाडे लागले आहेत. बसस्थानकच्या कोपऱयावर भाजी विक्री करणारे टेम्पो उभे असतात. चाँदणी चौक हा नावालाच आहे. या चौकात हातगाडीवाल्याची वर्दळ असते. तेथून मंगळवारतळय़ाकडे जाणाऱया रस्त्याने तर बेशिस्तच दिसते. हॉकर्स धारकांसाठी आणि फळविक्रेत्यांसाठी राजवाडा परिसरात इमारती बांधल्या आहेत. युनियन भाजी मंडईमध्ये कट्टे वापराविना पडून आहेत. प्रुट मार्केटकडे कोणीही जात नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पालिकेने अतिक्रमणाचा फार्स केला. आता राजवाडा परिसरातील वाढलेली अतिक्रमणे हटवणार कधी असा सवाल सत्ताधारी मंडळीकडून विचारला जावू लागला आहे.

नियोजन सभापती अल्लाउद्दीन शेख यांची भूमिका गुलदस्त्यात

नियोजन सभापती अल्लाउद्दीन शख यांची भूमिका नेहमीच गुपचिळीची राहिली आहे. हॉकर्सधारकांची बैठक पालिकेत झाली. मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी ही बैठक घेतली. त्यावेळी नियोजन सभापती अल्लाउद्दीन शेख यांना कसलीही याची कल्पना दिली नाही. त्यामुळे राजवाडा परिसरातील अतिक्रमणाच्या बाबतीत त्यांचीही भूमिका गुलदस्त्यातच राहिली आहे.