|Friday, August 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहराच्या विकासासाठी सहकार्य करणार

शहराच्या विकासासाठी सहकार्य करणार 

प्रतिनिधी/ सातारा

भाजपाच्या नगरसेवकांनी सातारा शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा यांच्या माध्यमातून कोटयावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. त्या निधीच्या माध्यमातून विकास कामे मंजूर झाली आहेत. प्रत्येक वॉर्डाचा विकास साधण्यासाठी मंत्रालयीन स्तरावरुन सातारा शहराला सहकार्य करा, अशी आर्जव भाजपाचे गटनेते धनंजय जांभळे यांनी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे भेटून केली. त्यांनीही सातारा शहरासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे अभिवचन दिले. 

सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हे सातारा दौऱयावर आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांचे स्वागत भाजपाचे गटनेते धनंजय जांभळे यांनी केले. त्यांना सातारा शहरासाठी भाजपाच्या माध्यमातून विकास कामे आणल्याचे सांगितले. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या कामांमध्ये रस्ते अनुदान, घनकचरा प्रकल्प, भुयारी गटर योजना, ग्रेड सेपरेट यासह विविध कामे आहेत. तसेच आणखी सातारा शहराच्या विकासासाठी आपण सहपालकमंत्री आहात. तुमच्या माध्यमातून भरीव अशा निधीची गरज आहे. जेणेकरुन शहराचा सर्वागिण विकास साधता येईल, आमचे सर्वच नगरसेवक विकासाचा चौफेर महामेरु उभा करत आहेत. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, अशा भावना त्यांच्याजवळ जांभळे यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनीही सातारा शहराच्या सर्वागिण विकासासाठी भाजपाच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीशी आहे. निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्वतोपरी सहकार्य असेल, असे अभिवचन त्यांनी दिले.

 

Related posts: