|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » म्हसवे हद्दीतील पूल पाडण्याच्या आदेशाची पायमल्ली

म्हसवे हद्दीतील पूल पाडण्याच्या आदेशाची पायमल्ली 

 

प्रतिनिधी/ सातारा

म्हसवे हद्दीतील माईलस्टोनजवळल महामार्गावरील पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून ते तातडीने पाडण्याचे आदेश आर्वी कन्सलटंट कंपनीने 30 जानेवारी 2017 रोजी दिले आहेत. तरीही गेंडय़ाची कातडी पांघरलेल्या रिलायन्स व त्यांच्या सहाय्यक कंपन्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या कंपन्या मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहेत का?, असा संतप्त सवाल जनतेमधून उठू लागला आहे. याबाबत भाजपचे पदाधिकारी अमोल सणस यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. हा पूल न पडल्यास येत्या आठ दिवसात रिलायन्स कंपनीला टाळे ठोकणार असल्याचे सांगितले.

  नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडिया (एनएचआयए) या कंपनीने देहुरोड ते शेंद्र हा 140 कि.मी. चा हायवेचे काम रिलायन्स कंपनीला दिले, त्यांनी विविध चार कंपन्यांना या कामाचे सबकॉन्ट्रक्ट दिले. प्रत्यक्षात शासनाने ठरवून दिलेल्या ड्रॉईंग प्रमाणे या कंपन्यांनी कोणतेही कामे केलेली नाहीत. कायद्याची पायमल्ली करीत भ्रष्टाचाराने हे काम निकृष्ट दर्जाची केली आहेत. याबाबत अमोल सणस, चिन्मय कुलकर्णी यांनी वारंवार आवाज उठवल्यावर जिल्हाधिकाऱयांनी नॅशनल हायवे ऍथॉरिटील पूल तातडीने पाडावा मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे, असे कळवले आहे. त्यानुसार एनएचआयने रिलायन्सला व रिलायन्सने आयटीडी सिमेंटेशन कंपनीला कळवले आहे, परंतु तब्बल वर्ष झाले तरी काहीही झालेले नाही.

  या पुलाखालून अनेकजण डि-मार्ट व माईलस्थेनकडे जातात तसेच हायवे असल्याने अनेक अवडज वाहने या पुलावरून जात आहेत. तरीही काहीही कारवाई अधिकारी वर्ग करताना दिसत नाही, त्यामुळे आता विविध सामाजिक संस्था पुढाकार घेवून या पुलाजवळ धोकादायक पूल म्हणून फलक लावणार आहेत.

गडकरीनी काळा डाग म्हंटले

आता काळया यादीत टाका

पुणे-सातारा महामार्गाचे काम ही काळा डाग असल्याचे वक्तव्य रस्तेविकास अवजड वाहन विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. आता या काळय़ा डाग असणाऱया कंपन्यांना काळय़ा यादीत टाकावे, अशी मागणी होवू लागली आहे.

गोलमाल है भाई सब गोलमाल

रिलायन्स व एनएचआयए या दोघांमध्ये आर्वी कन्सलटंट ही कंपनी टेक्निकल सल्लागार म्हणून काम करते. रस्त्यांची गुणवत्ता तपासून आर्वीने ओके सर्टिफिकेट दिले तरच रस्ता वाहतुकीला खुला केला जातो. असे असताना आर्वीने एनएचआयला म्हसवे हद्यीतील पूल धोकादायक असून तो लवकरात लवकर पाडून नवीन बांधवा अशा सूचना करून वर्ष होत आले तरी ही त्याची दाखल कंपन्यांनी घेतलेली नाही.

Related posts: