|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीयांचा कल अमरिकेऐवजी कॅनडाकडे

भारतीयांचा कल अमरिकेऐवजी कॅनडाकडे 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेने एच वन बी व्हिसा संदर्भात कठोर धोरण अवलंबिल्याने भारतीयांचे अमेरिकेबद्दलचे आकर्षण कमी होत आहे. त्याऐवजी परदेशी जाऊन भविष्य आजमाविणाऱया भारतीयांचा कल आता कॅनडाकडे वाढू लागला आहे. कॅनडाचे धोरण मुक्तद्वार धोरण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारतातील उच्च शिक्षित तंत्रज्ञाननी कॅनडामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यात त्यांना यशही येत आहे.

2016-17 या वर्षात भारताच्या 1 लाख विद्यार्थ्यांनी कॅनडामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. तर अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱया भारतीयांची संख्या याच वर्षात 1 लाख 86 हजार 267 इतकी होती. ही संख्या कॅनडामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असली तरी हे अंतर आता कमी होत आहे. 2016 या वर्षात कॅनडात गेलेल्या अनुमती धारक भारतीयांची संख्या 52870 होती. तथापि 2017 या वर्षात ऑक्टोबरपर्यंत 54425 भारतीयांनी कॅनडात स्थलांतर केले होते. येत्या चार वर्षात भारतीयांच्या स्थलांतराच्या संदर्भात कॅनडा अमेरिकेला मागे टाकेल अशी शक्यता आहे.