|Saturday, February 16, 2019
You are here: Home » क्रिडा » शिव कपुरकडे रॉयल गोल्फ चषक

शिव कपुरकडे रॉयल गोल्फ चषक 

वृत्तसंस्था/ पाटय़ा

भारताचा 35 वर्षीय गोल्फपटू शिव कपुरने 2017 च्या गोल्फ हंगामाचा शेवट विजेतेपदाने केला. रविवारी येथे झालेल्या रॉयल चषक गोल्फ स्पर्धेचे त्याने विजेतेपद मिळविले.

आशियाई गोल्फ टूरवरील त्याचे 2017 सालातील तिसरे विजेतेपद आहे. शिव कपुरने गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. शिव कपुरने थायलंडच्या मेसावतचा पराभव केला. शिव कपुरने आशिया गोल्फ टूरवरील पहिली स्पर्धा 2005 च्या डिसेंबरमध्ये जिंकली होती. त्यानंतर त्याने एप्रिल 2017 मध्ये दुसऱयांदा तर डिसेंबर 2017 मध्ये तिसऱयांदा स्पर्धा जिंकली आहे. शिव कपुरने युरोपियन चँलेज टूरवरील स्पर्धा दोनवेळा जिंकल्या आहेत.

Related posts: