|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » पुनरागमनानंतर पहिल्याच लढतीत सेरेना पराभूत

पुनरागमनानंतर पहिल्याच लढतीत सेरेना पराभूत 

वृत्तसंस्था/ अबुधाबी

अमेरिकन स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पुनरागमनानंतर पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. अबुधाबी येथील टेनिस स्पर्धेत प्रेंच ओपन चॅम्पियन ओस्टापेंकोने सेरेनाला 6-2, 3-6, 10-5 असे पराभूत केले. अवघ्या चार महिन्यापूर्वी सेरेनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. यानंतर, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी अबुधाबी येथील स्पर्धेत पुनरागमन करणाऱया सेरेनाला पहिल्याच लढतीत पराभूत व्हावे लागले. ‘बेकनंतर पहिला मॅच नेहमीच कठीण असते. मी पुनरागमन करु शकले, याचाच आनंद जास्त आहे.’ अशा भावना सेरेनाने सामन्यानंतर व्यक्त केल्या. 2017 मधील ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान सेरेना गरोदर असल्याचे कळले होते. यानंतर, सप्टेंबरमध्ये तिने एका बाळाला जन्म दिला होता. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुन्हा एकदा आपण जिंकण्याच्या इराद्याने उतरु, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.