|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » साक्षी, विनेश, बबिता भारतीय कुस्ती संघात

साक्षी, विनेश, बबिता भारतीय कुस्ती संघात 

वृत्तसंस्था/ लखनौ

ऑलिम्पिक कांस्यजेत्या साक्षी मलिकसह विनेश व बबिता कुमारी यांची ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱया राष्ट्रकूल स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे. मात्र, दंगल फेम गीता फोगटला पराभव स्वीकारावा लागल्याने ती राष्ट्रकूल व आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. लखनौतील साई केंद्रात राष्ट्रकूलसाठी चाचणी पार पडली. साक्षी मलिक (62 किलो), विनेश फोगट (50 किलो), बबिता कुमारी (54 किलो), पुजा धांदा (57 किलो), दिव्या करण (68 किलो) व किरण बिश्नोई (76 किलो) यांनी राष्ट्रकूलसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. हाच संघ किरगिस्तान येथे मेमध्ये होणाऱया वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार आहे. दंबग गर्ल गीता फोगाटला पात्रता फेरीतच पराभवाचा सामना करावा लागल्याने तिच्या कारकिर्दीबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.