|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मांद्रेतील पाणीपुरवठा सुरळीत करा, घागर मोर्चाचा इशारा

मांद्रेतील पाणीपुरवठा सुरळीत करा, घागर मोर्चाचा इशारा 

प्रतिनिधी/ मोरजी

मांद्रे पंचायत क्षेत्रातील नाईकवाडा आसकावाडा परिसरात दोन दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास पेडणे पाणी विभागावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा पंच प्रिया महेश कोनाडकर यांनी दिला आहे.

 प्रथमच नोव्हेंबर महिन्यापासून पूर्ण पेडणे तालुक्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करणारी क्षमात कमी असून ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चांदेल पाणी प्रकल्पाच्या विस्ताराची योजना असूनही ती आजपर्यंत कार्यरत झलेली नाही. मांद्रेत मतदारसंघात नवीन पाणी प्रकल्पाची गरज आहे. तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तुये येथे 15 एमलडीचा नवा प्रकल्प उभारण्यासाठी योजना आखली होती. ती कार्यरत झाली तर मांद्रे मतदारसंघात सलग 24 तास पाणीपुरवठा होऊ शकतो. त्या दृष्टीने आता सरकारने व स्थानिक पंचायतीने पाणी प्रकल्प सुरु करण्यास प्रयत्न केले पाहिजेत.

मांद्रे मतदारसंघ हा विरोधी विरोधी पक्षाचा मतदारसंघ असल्याची भावना सरकारने ठेवू नये. पेडणे मतदारसंघात 24 तास पाणीपुरवठा अगोदर करा, असा आदेश पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी पाणी विभागाच्या अधिकाऱयांना तोंडी दिला आहे. त्यानुसारच पेडणे मतदारसंघात जास्त व मांद्रे मतदारसंघात कमी पाणीपुरवठा अशी परिस्थिती आहे. यात मतभेद केले जात असून सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.