|Thursday, July 18, 2019
You are here: Home » leadingnews » विदर्भाने ‘रण’ जिंकले…

विदर्भाने ‘रण’ जिंकले… 

ऑनलाईन टीम / इंदूर :

रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाने दिल्लीचा 9 गडी राखून पराभव करीत करंडकावर आपले नाव कोरले. हा सामना जिंकत विदर्भाने नवा इतिहास घडविला.

दुसऱया डावात विदर्भासमोर विजयासाठी अवघ्या 29 धावांचे आव्हान होते. हे आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी लीलया पार केले. दुसऱया डावात अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या माऱयासमोर दिल्लीचा संघ खरा उतरू शकला नाही. ध्रुव शौरी आणि नितीश राणा यांनी तिसऱया विकेटसाठी शतकी भागीदारी रचत विदर्भाचा विजय लांबवला. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. विदर्भाच्या टीमकडून पहिल्या इनिंगमध्ये अक्षय वाडकरने 133 धावांची धडाकेबाज इनिंग खेळली. त्यामुळे विदर्भाच्या टीमला सामन्यावर आपली मजबूत पकड निर्माण करता आली. विदर्भाचा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट्स घेतले. तर दुसऱया इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे रजनीश गुरबानी याने या मॅचमध्ये एकूण आठ विकेट्स घेतले आहेत. तोच विजयाचा शिल्पकार ठरला.