|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्टेट बँकेच्या कागल शाखेत ग्राहकांना योग्य सेवा देण्याची मागणी

स्टेट बँकेच्या कागल शाखेत ग्राहकांना योग्य सेवा देण्याची मागणी 

प्रतिनिधी/ कागल

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कागल शाखेत ग्राहकांना योग्य प्रकारे वागणूक दिली जात नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र बँकेच्या कारभारात सुधारणा होण्याऐवजी तक्रारीच जास्त ऐकावयास मिळत आहेत.

सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील विराज सिटीच्या इमारतीत सुरु झाली आहे. यापूर्वी रिंगरोडवरील जोशी यांच्या जागेत होती. सदरची जागा लहान होती. त्यामुळे नागरिकांची होणारी गर्दी होत होती. त्यामुळे कामामध्ये एकसूत्रीपणा नव्हता. जागा लहान म्हणून नागरिकांना तिष्ठत बसावे लागते. या सबबीवर नागरिकही मुकाटपणे त्रास सहन करत होते. गेल्या महिन्यापासून ही शाखा विराज सिटीच्या इमारतीत सुरु झाली आहे. ही जागा भव्य व प्रशस्त आहे. या ठिकाणी देवाण-घेवाणीचे पाच कौंटर आहेत व ग्राहकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यातील एकाच खिडकीवर पैसे भरणे, काढणे, पासबूक भरुन देणे अशा प्रकारची कामे एकाच व्यक्तीला करावी लागत असल्याने ग्राहकांना काम सोडून दोन दोन तिष्ठत बसावे लागते. इतके करुनही नंबर आल्यानंतर जर त्या खिडकामध्ये  काम होणार नसेल तर पुन्हा ग्राहकांना दुसऱया खिडकीकडे जावे लागते. ही परिस्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. याबाबत तक्रार केल्यास तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करा, असे स्पष्ट सांगितले जाते. बैठक व्यवस्था ही बसस्थानकातील बैठक व्यवस्थेप्रमाणे असल्याने आपण बँकेत काम करण्यासाठी आलो आहोत की आणखीन कोठे ? अशी विचित्र परिस्थिती ग्राहकांची होत आहे.

या ठिकाणी असलेला सुरक्षारक्षक हा विनाकारण ग्राहकांवर चिडत असतो. बँकेचे व्यवहार हे ग्राहकांच्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना सर्वांनी चांगली वागणूक देणे गरजेचे असताना या बँकेत मात्र उलटे चित्र आहे. भरमसाठ वेतन मिळत असल्याने कर्मचाऱयांना ग्राहकांच्या त्रासाचे कोणतेही सोयीरसुतक नसते. याबाबत शाखाधिकाऱयांनी सुधारणा करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.