|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » भीमा – कोरेगाव प्रकरणी न्यायालयीन चौकशी : मुख्यमंत्री

भीमा – कोरेगाव प्रकरणी न्यायालयीन चौकशी : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / पुणे :

भीमा-कोरेगाव प्रकरणात न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱयांवर कारवाई करू,असे देखील मुख्यमंत्री म्हणाले

पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या 6 कंपन्या तैनात केल्या आहेत. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर दगडफेक व जाळपोळीत झाले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.