|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केंद्राची 240 लक्ष्यभेदी बॉम्ब, बराक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी

केंद्राची 240 लक्ष्यभेदी बॉम्ब, बराक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी 

नवी दिल्ली:

 केंद्र सरकारने मंगळवारी भारतीय वायूदलासाठी 240 अचूक लक्ष्यभेदी बॉम्ब आणि नौदलासाठी 131 बराक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली. या खरेदीकरता 1717 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले. अचूक निर्देशित दारूगोळय़ाच्या शेणीत समाविष्ट होणारे बॉम्ब रशियाच्या मेसर्स जेएससी रोसोनबोरोन एक्स्पोर्ट्सकडून 1254 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले जाणार आहेत. या बॉम्बच्या खरेदीमुळे भारतीय वायूदलाच्या शस्त्रास्त्र भांडारातील कमतरता दूर होण्यासोबत आक्रमणाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. तर नौदलाकरता इस्रायलच्या कंपनीकडून 460 कोटी रुपयांच्या किमतीत 131 बराक क्षेपणास्त्रs प्राप्त केली जातील. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारतीय युद्धनौकेवर ही क्षेपणास्त्रs तैनात केली जातील.