|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा बसस्थानकावर आता सीसीqिटव्हीची नजर

सातारा बसस्थानकावर आता सीसीqिटव्हीची नजर 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील गुन्हेगारी कारावायांवर नजर ठेवण्यासाठी सातारा शहरा पोलीस ठाण्याने लोकसहभागातून याठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आठ पॅमेऱयांव्दारे बसस्थानकाचा परिसर नजरेखाली ठेवण्यात येणार आहे. बसस्थानक परिसर पोलिसांच्या नजर कैदेत राहिल्याने गुन्हेगारांना लवकर पकडण्यात आता सीसीटिव्ही मदत करणार आहे.

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दरोरोज भांडणे, मारामारी, पाकिट मार, छेड छाड असे गुन्हे रोजच होत असतात. तसेच दिड ते दोन हजार एसटी बसेसमधून सुमारे एक ते दोन लाख प्रवासी येत असतात. चोवीस तास गर्दीने गजबजलेल्या या बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात असतात, मात्र परिसर, गर्दी लक्षात घेता त्यांच्या कामावर मर्यादा पडतात. सकाळी सर्व महाविद्यालये सुटण्याच्यावेळी, गर्दीच्या हंगामात या बसस्थानकावर मारा मारी, चोरी अशा घटना सतत घडत असतात. या घटना घटल्यानंतर त्यांच्या तक्रारी नोंद होतात, मात्र चोरटयांचा तपास करणे अवघड होत. गुन्हेगारांबरोबरच भुरटे चोर आणि हुल्लडबाजांचा त्रास याठिकाणी येणाऱया प्रवाशांना नेहमीच होत असतो. या ठिकाणी होणाऱया गुन्हेगारी कारवाया रोखता याव्यात तसेच त्यातील गुन्हेगारांना जेरबंद करता यावे यासाठी या परिसरात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचा विचार पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी केला होता. आता सीसीटिव्हीच्या वॉचमुळे बसस्थानक परिसर पोलीसांच्या नजर कैदेत राहणार आहे.

 

सीसीटिव्हीमुळे पोलीसांची करडी नजर…

मध्यवर्ती बसस्थानकात बसविण्यात आलेल्या यंत्रणेव्दारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठवण्यात येणार असून गर्दीच्या हंगामात होणाऱया चोऱया, हाणामाऱया रोखण्यात किंवा तसे गुन्हे घडल्यास त्यातील गुन्हेगारांपर्यत पोहचेण सीसीqिटव्ही मुळे शक्य होणार आहे.