|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेला गळती निघेना

पालिकेला गळती निघेना 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेत अलिकडे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि काही कर्मचारी हे बिनकामाचे झाले आहेत. ते नगरसेवक आणि पदाधिकाऱयांचेही ऐकत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका खडकेश्वर परिसरातील नागरिकांना बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुरुस्तीच्या नावाखाली खेळ केला अन् साराच बटय़ाबोळ करुन ठेवला आहे. सुमारे 50 कुटुंबांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. ती प्राधान्याने सोडवली नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा यादोगोपाळ पेठेतील नागरिकांनी दिला आहे.

यादोगोपाळ पेठेत जानकीबाई प्रेमसुख झंवर या शाळेच्या बाहेर जलवाहिनीला बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती केली खरी. परंतु होत्याचे नव्हते केले. आणखी बिघाड करुन गळती सुरुच ठेवली. या बिघाडामुळे शाळेच्या समोरील व यादोगोपाळ पेठेतील तब्बल 50 कुटुंबांना गेल्या दोन दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबतची तक्रारही पालिकेत केली. परंतु पाणी पुरवठय़ाचे काही अधिकारी हे स्वतःच्याच मस्तीत वागत असल्याने त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

Related posts: