|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ता.पं.च्या ताळेबंद बैठकीत मराठीतून दिली माहिती

ता.पं.च्या ताळेबंद बैठकीत मराठीतून दिली माहिती 

निवेदन दिल्यानेच केली पूर्तता, मराठी सदस्यांमधून समाधान

प्रतिनिधी/ बेळगाव

तालुका पंचायत सभागृहात मराठीतून कागदपत्रे मिळणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे मराठी व म. ए. समितीच्या सदस्यांनी आपल्याला मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुका पंचायतमध्ये मंगळवारी झालेल्या ताळेबंद बैठकीत मराठीमधून माहिती देण्यात आली आहे.

प्रत्येक सर्वसाधारण बैठकीबरोबरच इतर बैठकांमध्येही मराठीत कागदपत्रे देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे येत्या बैठकीमध्ये मराठीतून कागदपत्रे मिळावीत अशी मागणी तालुका पंचायतीच्या म. ए. समितीच्या सदस्यांनी कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील यांच्याकडे केली होती. याची दखल घेवून त्यांनी ताळेबंद बैठकीत मराठीतून माहिती दिल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे येथील सदस्यांनी आता कागदपत्रेही देण्यात यावीत, अशी मागणी लावून धरली होती. मात्र येत्या काही दिवसांत कागदपत्रेही मराठीत देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी आप्पासाहेब किर्तने यांनी मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी केली. यावर विचार करु, असे आश्वासनही देण्यात आले. 

Related posts: