|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » मराठा समाजाने मोठय़ा भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे : छत्रपती संभाजीराजे

मराठा समाजाने मोठय़ा भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे : छत्रपती संभाजीराजे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावर भाष्य केले असून मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, तर दलित समाज हा लहान भाऊ आहे. त्यामुळे मराठा समाजाने एखाद्या मोठय़ भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदले पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

 

भीमा कोरेगाव हिंसेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यानंतर आज या बंदीचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे याबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “फुले, शाहू, आंबेडकर यांच्या भूमीत भीमा कोरेगावसारखी घटना घडणे हा प्रकार खूपच दुःखद आहे. महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे, असे मी मानतो. मात्र, आपण समाजकंटकांच्या समाजात द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांना बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही मोजक्मया समाजविघातक शक्तींमुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये. त्यामुळे लोकांनी संयम आणि शांतता राखून ही फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्यासारख्या विचारी लोकांची भूमी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवावे. भीमा कोरेगावच्या हिंसाचारामागे ज्या समाजविघातक शक्ती असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई करताना ती व्यक्ती कोणत्या समाजाची आहे, याचा विचार करू नये.’’

 

 

 

Related posts: