|Sunday, November 18, 2018
You are here: Home » उद्योग » पाकमध्ये ‘युआन’ वापर

पाकमध्ये ‘युआन’ वापर 

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये चीनबरोबरच्या द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी देशात चिनी चलन युआनच्या वापरास मंजुरी दिली आहे. सीपीईसी प्रकल्पात सध्या वापरात असणाऱया अमेरिकन डॉलर्सची जागा आता युआन घेणार आहे. युआनच्या देशातील वापरासाठी परवानगी देण्यात आल्याचे मध्यवर्ती बँक असणाऱया स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने म्हटले.

यापूर्वी 19 डिसेंबर रोजी अमेरिकन डॉलरच्या जागी युआनचा वापर करण्यासाठी सरकारकडून विचार करण्यात येत आहे, असे पाकिस्तानचे विकास मंत्री अहसान इक्बाल यांनी म्हटले होते. आता पाक, चीनमधील व्यापाऱयांकडून आयात, निर्यात आणि आर्थिक व्यवहारासाठी युआनचा वापर होणार आहे. खासगी आणि सरकारी व्यवहारात युआनचा वापर वाढल्याने डॉलर्सच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया अधिक कमजोर होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार अजून झालेला नाही. तो झाल्यास पाकिस्तानची निर्यात वाढीस मदत होईल असा अंदाज आहे.

Related posts: