|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » जीग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

जीग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पुण्यात गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / पुणे   :                                          

उमर खालिद व जिग्नेश मेवाणी यांच्याविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.31 डिसेंबर रोजी शनिवारवाडा येथे दोघांनी भाषण करून धार्मिक,जातीय अशी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत 31 डिसेंबरला शनिवारवाडय़ात ‘एल्गार परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. याच एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणींनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप होता. काही युवकांनी पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.31 डिसेंबरला झालेल्या पुण्यातील एल्गार परिषदेला ‘समस्त हिंदू आघाडी’चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी तीव्र विरोध केला होता. हा कार्यक्रम झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच हा कार्यक्रम होऊ नये याबाबत त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना निवेदनही दिले होते.परंतु डेक्कन नंतर आज पुन्हा एकदा त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.