|Saturday, December 15, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राजनीति

राजनीति 

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च, हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या ।

नित्य व्यया प्रचुरनित्य धनागमा च, वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा ।।

? सत्यानृता च, परुषा प्रियवादिनी च, हिंस्रा दयालुः, अपि च, अर्थपरा वदान्या च, नित्यव्यया, प्रचुरनित्यधनागना च, नृपनीतिः,  वाराङ्गना इव अनेकरूपा (दृश्यते) ।

? कधी खरी कधी खोटी, कधी कठोर, तर कधी गोडबोली, कधी हिंस्र, तर कधी दयाळू, कधी पैसा जमविण्यात तत्पर तर कधी उदार, नेहमी भरपूर खर्च करणारी, आणि पैशाची नेहमी भरपूर आवक असलेली अशी राजनीती ही एखाद्या वेश्येप्रमाणे बहुरूपी असल्याचे दिसून येते.

? भर्तृहरीने नीतिशतकात दिलेले हे राजनीतीचे रूप आजही प्रत्ययास येते. राजनीतीमध्ये आज (क्वचित) सत्य ही दिसते, तर हेतूपूर्तीसाठी तद्दन खोटेपणाही अनुभवाला येतो. प्रतिस्पर्धांना चीत करण्यास हिंस्रपणाही दाखविला जातो, तर आपल्या पित्र्यांवर दयाळू वृत्तीने मेहेरनजर केलेली दिसते. पैसा गोळा करणे हे ध्येय असतेच पण (दूरच्या फायद्यासाठी) औदार्यही दाखविले जाते. पैसा वारेमाप उधळला जातोच नेहमी, पण विविध स्रोतांच्याद्वारे पैशाचा ओघही येत असतो. तात्पर्य राजनीती ही बहुरंगी आणि बहुरूपी अशीच आजही दिसून येते. ग्राहकाला भुलविण्यासाठी नाना रूपे धारण करणाऱया वेश्येप्रमाणे!

-नीतिशतक, भर्तृहरी

Related posts: