|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » झरेत कडकडीत बंद

झरेत कडकडीत बंद 

प्रतिनिधी /आटपाडी :

भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ आटपाडी तालुक्यातील झरे येथे गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वत्र बुधवारी महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला असलातरी गुरूवारी झरेत स्वयंस्फूर्तीने लोकांनी बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविला.

विनोद वाघमारे, अरूण वाघमारे, दादा हवालदार, सागर सुळे, ओंकार कुलकर्णी, अमर कोळी, राहुल कारंडे, मनोहर वाघमारे, नितीन वाघमारे, गंगाराम वाघमारे, दत्ता जावीर यांच्यासह ग्रामस्थांनी गावातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केले. झरेतील सर्व व्यवसायिकांनी सकाळपासून आपली दुकाने बंद ठेवली. गावात उत्स्फूर्तपणे शंभर टक्के कडकडीत बंद पाळून सामाजिक दुही माजविण्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

Related posts: