|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » व्हिसा नियमात बदल करण्यास लोकप्रतिनिधींचा विरोध

व्हिसा नियमात बदल करण्यास लोकप्रतिनिधींचा विरोध 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेत कामासाठी गेलेल्या भारतीयांच्या एच1बी व्हिसाचा कालावधी न वाढविण्याची तरतूद असणाऱया अमेरिकेच्या विधेयकावर तेथील काही लोकप्रतिनिधींनी टीका केली आहे. ट्रम्प यांची ही योजना कार्यान्वित झाल्यास सुमारे साडेसात लाख भारतीयांवर भारतात परत येण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये बुद्धिवान तंत्रज्ञांची मोठी कमतरता जाणवणार आहे. तसेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही याचा विपरित परिणाम होणार आहे, अशी टीका डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते तुलसी गॅबार्ड यांनी केली. असा निर्णय घेतल्यास अमेरिकेचा चांगला मित्र असणाऱया भारताचीही अमेरिकेचे संबंध बिघडू शकतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे व्हिसासंबंधीच्या नियमांमध्ये कोणताही बदल करू नये, अशी भूमिका राजा कृष्णमूर्ती या लोकप्रतिनिधीनेही व्यक्त केली.