|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पाटणकर हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

पाटणकर हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

नागोजीराव पाटणकर हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ मोठय़ा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. सोपान चव्हाण होते. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. हेमा गंगातीरकर यांची उपस्थिती होती.

  गंगातीरकर म्हणाल्या, आजचं जग हे नैराश्याच, ताणतणावाचं, जागतिकीकरणाचं असून वेळोवेळी मोठय़ा आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी आव्हानांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य शालेय जिवनातच आत्मसात करणं गरजेचं आहे.

  बी. एन पाटणकर आणि एन. एल. ठाकूर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढवा सांगितला. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. आर. गुरव यांनी तर सूत्रसंचालन एस. आर. बाबळे यांनी केले. यावेळी सिद्धार्थ पाटणकर, नकूल पाटणकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. मुख्याध्यापक पी. जे. बामणे यांनी आभार मानले.

Related posts: