|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » कमला मिल्स आगप्रकरणी मोजो पबमालक युग पाठकला अटक

कमला मिल्स आगप्रकरणी मोजो पबमालक युग पाठकला अटक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कमल मिल आग दुर्घटनाप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला अटक करण्यात आली आहे. मोजोचे मालक युग पाठक आणि युग तुली यांच्यासोबतच मॅनेजरविरोधातही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत 11 तरूणींसह 14 जणांचा मृत्यू झाला होता..गुरूवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबव्ह या पब,रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये 24 महिलांसह 54 जण जखमी झाले होते. यानंतर या आगीचे मूळ ‘मोजो बिस्ट्रो’ असल्याचे समोर आले. त्यानंतर या पबचे मालक युग पाठक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. युग पाठक हा पुण्याचे माजी पोलिस आयुक्त के. के पाठक यांचा मुलगा आहे.

 

Related posts: