|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कामटेच्या बेन मॅपिंग, नार्कोसाठी सीआयडीचा अर्ज

कामटेच्या बेन मॅपिंग, नार्कोसाठी सीआयडीचा अर्ज 

प्रतिनिधी/ सांगली

येथील अनिकेत कोथळे खून प्रकरणी कारागृहात असलेल्या बडतर्फ पीएसआय युवराज कामटे याचा बेन मॅपिंग आणि नार्कोसाठी सीआडीने येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधितांवर महिनाअखेर पर्यंत न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे तपास सीआयडीचे पोलीस अधीक्षक मुपुंद पाठक यांनी सांगितले.

पोलीस मारहाणीमध्ये येथील अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याकडील पीएसआय युवराज कामटेसह सात पोलिसांना अटक केली असून त्यांच्यावर खटला सुरू आहे. हा तपास सीआयडीमार्फत सुरू असून या प्रकरणामध्ये बडतर्फ पीएसआय युवराज कामटे यांनी पोलीस कोठडतील 14 दिवस असताना पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही.

 गुन्हय़ाची माहितीही दिली नाही. त्यामुळे मुख्य संशयात आरोपी कामटे याचा बेन मॅपिंग करण्यासाठी परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीने येथील न्यायालयात केला आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात असून महिना अखेरपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.