|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » लादेनच्या नातवाचा मृत्यू

लादेनच्या नातवाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

ओसामा बिन लादेनचा नातू ओसामा बिन हमजा बिन लादेनचा मृत्यू झाल्याची माहिती ‘अल-कायदा’ने पत्रकाद्वारे दिली आहे. मात्र, एकीकडे पाक- अफगाणिस्तान सीमेवरील हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संभ्रमावस्था आहे.

ओसामा बिन हमजा बिन लादेनचे मृत्यूसमयी वय बारा वर्ष होते. अल कायदासाठी काम करणाऱया ग्लोबल इस्लामिक मीडिया प्रंटतर्फे इंग्रजीत अनुवाद केलेले एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनने हे पत्र लिहीले आहे. ‘माझा मुलगा आणि ओसामा बिन लादेनचा नातू ओसामा बिन हमजा बिन लादेन शहीद झाला’ असे या पत्रात म्हटले आहे.

Related posts: