|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » मनोरंजन » मकरंद अनासपुरे साकारणार डॉ. तात्याराव लहाने

मकरंद अनासपुरे साकारणार डॉ. तात्याराव लहाने 

कॉमेडी चित्रपटांना आपल्या अभिनयाने न्याय देणारा अभिनेता मकरंद अनासपूरे डॉ. तात्याराव लहानेंची भूमिका साकारणार आहे. येत्या 12 जानेवारी डॉ. तात्या लहाने : अंगार… पॉवर इन विदीन चित्रपट रिलीज होणार आहे.

 या चित्रपटात डॉ. तात्याराव लहाने यांचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने डॉ. तात्या लहानेंनी आपल्या आठवणींना उजाळा दिला व त्यावेळी ते म्हणाले, आज मी जिवंत आहे आणि जे आज मी दिवस पाहतोय ते माझ्या आईमुळेच. जर माझ्या आईनी मला तिची किडनी दिली नसती तर मी आजचे हे दिवस पाहू शकलो नसतो. प्रत्येकाची आई आपल्या मुलाला एकदाच जन्म देते. पण, माझ्या आईने मला दोनदा जन्म दिला आहे. डॉक्टर पुढे म्हणाले की, डॉक्टरकी हा व्यवसाय नसून ती एक सेवा आहे. त्यामुळे डॉक्टरांनी डॉक्टरकी पेशाला व्यवसाय न समजता ती एक सेवा समजून काम केले पाहिजे. तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात रक्तदानचा प्रसार झाला आहे. पण, अजूनही अवयव दानाकडे गांभीर्याने घेतले जात नाही. आज आपल्या देशात अवयवदानाची नितांत गरज असूनसुद्धा अवयव दानाचे प्रमाण बाहेरच्या देशापेक्षा आपल्या देशात कमी आहे. आपण सगळय़ांनी जागरूक होऊन अवयवदान करुन गरजू जनतेचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करावे व त्यांना नवे जीवन द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. 

 चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विराग वानखेडे यांनी सांगितले की, मी नेत्रदानाच्या जागफतीसाठी रोशनी जिंदगी में या अभियानांच्या अंतर्गत अंधव्यक्तीच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तब्बल 100 दिवस स्वत:च्या डोळय़ांना पट्टी बांधून त्यांची जीवनशैली अनुभवली. 555 तास 5 मिनिट 5 सेकंदपर्यंत गाण्याचा विश्वविक्रम करून चीन मधील 465 तासांचा गाण्याचा विक्रम मोडून नवा विश्वविक्रम केला व या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. मी 6 दिवस आणि 6 रात्र न जेवता न झोपता 120 तास गाण्याचा विक्रम करून लंडनच्या आयन गिब्सनचा 28 तास आणि 27 मिनिटांचा रेकॉर्ड मोडून नवा विश्व विक्रम केला आणि नेत्रदानाच्या जागफकतेसाठी कलर चॅनलवर 155 तबला वादकांसोबत न थांबता सलग 1 मिनिट 45 सेकंद तबला वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड केला.

सिनेमाची कथा-पटकथा-संवाद विराग यांनी स्वत: लिहिले असून सिनेमाचे संगीत एक हिंदुस्थानी या संगीतकाराने केलं आहे. सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक विराग मधुमालती वानखडे यांनी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. लहानेंचा जीवनपट दोन-अडीच तासांत अतिशय उत्तमरित्या गुंफला आहे. काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू… हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वत: गायलं असून एक हिंदुस्थानी यांनी संगीतबद्ध केलं आहे. तसेच सिनेमातील एका गाण्याला केतकी माटेगावकर हिने देखील आवाज दिला आहे.  अलका कुबल या डॉ. लहानेंच्या आई अंजलीबाईंच्या भूमिकेत आहेत. यांच्यासोबत सिनेमात रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांच्या विशेष भूमिका आहेत.

Related posts: