|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » फेसबुकवर महाराष्ट्र बंदची फेक पोस्ट टाकणाऱया तरुणावर कारवाई

फेसबुकवर महाराष्ट्र बंदची फेक पोस्ट टाकणाऱया तरुणावर कारवाई 

प्रतिनिधी / सोलापूर

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे अशा प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकून अफवा पसरवल्याप्रकरणी सोलापूर जिह्यातील एका तरूणावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भीमा-कोरेगाव येथे दंगल उसळली होती. याचा निषेध करण्यासाठी 10 जानेवारी 2018 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे, अशा प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट  जिह्यातील एका 21 वर्षीय तरुणाने फेसबुकवर टाकून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला होता. वास्तविक सकल मराठा समाजाच्या वतीने अशा प्रकारचा बंदचा कोणताही निर्णय घेतला नाही. सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सायबरसेलने सदर पोस्टचा शोध घेतल्यानंतर फेक पोस्ट टाकणाऱया तरुणाचा शोध लागला. त्या तरुणाला ताब्यात घेवून त्याच्यावर सायबरसेलच्या वतीने कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला रितसर नोटीस देवून ताकीद देण्यात आले.

नागरिकांनी अशा प्रकारच्या म्हणजेच अफवा पसरविणाऱया पोस्ट व्हॉट्सऍप किंवा फेसबुकवर टाकू नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास सायबरसेलच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तालयातील सायबरसेलच्या वतीने देण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाचे आवाहन

भीमा-कोरेगाव येथील घटनेनंतर सामाजिक वातावरण बिघडविण्यासाठी खोडसाळपणे काही लोकांकडून सकल मराठा समाजाच्या नावाचा गैरवापर करण्यात येत असून, महराष्ट्र बंद करण्याचा कोणताही निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला नाही. अशा प्रकारच्या फेक पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.

Related posts: