|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भिडे गुरुजींवरील आरोप राजकीय स्वार्थापोटी

भिडे गुरुजींवरील आरोप राजकीय स्वार्थापोटी 

प्रतिनिधी/ निपाणी

संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवप्रतिष्ठान, हिंदूस्थान ही संघटना देश, देव, धर्म यासाठी तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम अनेक वर्षापासून करत आहे. असे असताना 1 जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये संभाजीराव भिडे गुरुजींचे नाव नाहकपणे गोवण्यात आले आहे. भिडे गुरुजींवर आरोप हे राजकीय स्वार्थासाठी असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी व यामागील सूत्रधाराचा छडा लावून सामाजिक वातावरण शुद्ध राहण्यासाठी मदत करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आली.

निपाणीत यासंदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान यांच्यावतीने तहसीलदारांच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदनात, भिडे गुरुजी हे त्यांच्या देशकार्यात सदैव व्यस्त आहेत. आगामी गडकोट मोहीम, 32 मण सुवर्णसिंहासन या विषयावरती गावोगावी त्यांच्या उत्स्फूर्त सभा सुरू आहेत. भिमा कोरेगाव येथे जी दुर्दैवी घटना घडली त्यावेळी भिडे गुरुजी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या सांत्वनासाठी सांगली जिल्हय़ात ईश्वरपूरला गेले होते. त्यानंतर गुरुजींची भोर येथे हजारो धारकऱयांसमोर सभा झाली. असे असताना गुरुजींना जाळपोळ व दगडफेक करताना पाहिल्याचे म्हणणे खोटे आहे.

या प्रकारातून जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही संघटना व नेते जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांमध्ये जातीय वाद करून फूट पाडत आहेत. यापूर्वीही गुरुजींना भक्तीशक्ती प्रकरणावेळी असे गुन्हय़ात नाहकपणे अडकवण्याचे प्रयत्न काही संघटनांनी केले होते. या प्रकरणातही अत्यंत खोडसाळपणे त्यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सदर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी संघटेनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Related posts: