|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 31मार्चपासून जिओची फ्री सेवा बंद

31मार्चपासून जिओची फ्री सेवा बंद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 4 जी इंटरनेटची मोफत सेवा पुरवली आहे. मात्र आता जिओ ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. नवनवे प्लॅन बाजारात आणत असतानाच दुसरीकडे मोफत सेवा वापरणाऱया नेटकऱयांची जिओने निराशा केली आहे. येत्या 31 मार्चपासून रिलायन्स जिओ आपली मोफत सेवा बंद करणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 21 फेब्रुवारी 2017 ला 4 जी सेवा पुरवणारी जिओ प्राईम मेंबरशिप बाजारात आणली होती. या प्लॅन साठी मेंबरशिप घेण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख होती. मात्र कंपनीने मेंबरशिप होण्यासाठी ही तारीख वाढवून 15 एप्रिल 2017 केली. यांची वैधता 1 वर्षासाठी होती. या मेंबरधारकांची ही सेवा आता 31 मार्च रोजी बंद होणार आहे. त्याचबरोबर फ्री ऍप्सदेखील बंद होणार आहे.

मात्र नववर्षानिमित्त ग्राहकांसाठी जिओ ने हॅप्पी न्यू ईअर प्लॅनदेखील आणला आहे. या प्लॅनध्ये नेटकऱयांना दिवसा 1 जीबी डेटा असलेल्या प्लॅनच्या किंमतीत 50 ते 60 रूपयांनी कपात केली आहे.

 

 

 

 

Related posts: