|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » आकसापोटीच आमच्यावर गुन्हा : कबीर कला मंच

आकसापोटीच आमच्यावर गुन्हा : कबीर कला मंच 

 पुणे / प्रतिनिधी :

भीमा कोरेगाव घटनेत कबीर कला मंच आणि एल्गार परिषदेचे आयोजक यांचा कोणताही हात नसून, आमच्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा आकसातून दाखल करण्यात आला आहे. यात सरकारची भूमिका धर्माच्या नावावर राजकारण करण्याची आहे. आम्ही दलित, ओबीसी, मराठा आणि सर्व हिंदू जनता काही कट्टर हिंदूत्ववादी ताकदी विरोधात उभे राहिलो आहोत, असे सांगत कबीर कला मंच आणि एल्गार परिषदेच्या आयोजकांनी बुधवारी आपली बाजू पत्रकारांसमोर मांडली.

 आकाश साबळे म्हणाले, कात्रज भागात राहणाऱया एका व्यक्तीने कबीर कला मंच आणि आयोजक यांच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे. तो पूर्णपणे खोटा आहे. 1 जानेवरीला भीमा कोरेगावचा प्रकार घडला आणि त्यानंतर जवळपास सात ते आठ दिवसांनी म्हणजे 8 जानेवारीला पोलिसांनी कबीर कला मंच आणि आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा आकसापोटी दाखल करण्यात आला आहे. तसेच कबीर कला मंच नक्षलवादी संघटना असल्याचे म्हणले जात आहे. परंतु आम्ही कोणत्याही नक्षलवादाचे समर्थन कधीही केले नाही. 1 जानेवारीचा भीमा कोरेगाव प्रकार आणि एल्गार परिषद यांचा कोणताही संबंध नाही. हा प्रकार या परिषदेमुळे झालेला नाही, तेथे दरवर्षी लोक 1 जानेवारीला जमत असतात. मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे आणि घुगे यांनी या घटनेच्या आधी तेथे जाऊन सभा घेतल्या होत्या तसेच यांच्याविरोधात संपूर्ण पुरावे असून, त्यांच्याविरोधात सर्व भारतातून आक्रोश निर्माण झाला आहे. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. तरी देखील सरकार त्याचे समर्थन करत आहे. या प्रकरणात सरकारची धर्माच्या नावावर राजकारण करण्याची भूमिका स्पष्ट दिसत आहे.

एल्गार परिषद होऊ नये, यासाठी देखील जोरदार प्रयत्न करण्यात आले. स्वतः महापौरांनी देखील परिषदेला विरोध दर्शविला होता. या परिषदेचा भीमा कोरेगाव प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. आमच्या विरोधातील गुन्हा हा क्रॉस कम्प्लेन्टचा आहे. या प्रकरणातील खरे गुन्हे शोधण्यासाठी भिडे आणि एकबोटे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखील पुढे येऊ लागली आहे. 

 

Related posts: