|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » दबावामुळे बाजार किरकोळ घसरणीने बंद

दबावामुळे बाजार किरकोळ घसरणीने बंद 

बीएसईचा सेन्सेक्स 10, एनएसईचा निफ्टी 5 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

सलग नवीन विक्रम स्थापित  होण्यास बुधवारी अखेर ब्रेक लागला. निफ्टी 10,600 च्यावर बंद झाला. मिडकॅप आणि बँक निफ्टीने बाजारात दबाव आणण्याचे काम केले होते. सिंगल ब्रॅन्ड रिटेल क्षेत्रात 100 टक्के एफडीआयची घोषणा करण्यात आल्याने यासंबंधित समभागात तेजी आली. दिवसभरात निफ्टी 10,655 आणि सेन्सेक्सने 34,566 ची नवीन विक्रमी पातळी गाठली होती. 

बीएसईचा सेन्सेक्स 10 अंशाने घसरत 34,433 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 5 अंशाच्या कमजोरीने 10,632 वर स्थिरावला. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात दबाव दिसून आला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.15 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरला.

बँकिंग, वाहन, औषध, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात विक्री झाली. निफ्टीचा पीएयसू बँक निर्देशांक 1.4 टक्के, वाहन निर्देशांक 0.7 टक्के, औषध निर्देशांक 0.25 टक्क्यांनी कमजोर झाले. बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.7 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 0.4 टक्क्यांनी घसरले. आयटी आणि रियल्टी समभागात जोरदार खरेदी झाली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 2.25 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

टीसीएस, विप्रो, भेल, एचसीएल टेक, एचपीसीएल, टेक महिंद्रा, कोल इंडिया, अदानी पोर्ट्स 3.6-1 टक्क्यांनी वधारले. आयशर मोटर्स, एनटीपीसी, यूपीएल, एशियन पेन्ट्स, डॉ. रेड्डीज लॅब, टाटा मोटर्स डीव्हीआर, बजाज ऑटो 1.75-1.1 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅपमध्ये कन्टेनर कॉर्प, अल्केम लॅब, जिंदाल स्टील, जीएमआर इन्फ्रा, ओबेरॉय इन्फ्रा 6.8-4 टक्क्याने वधारले. पेज इन्डस्ट्रीज, जीई टी ऍण्ड टी इंडिया, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, 3एम इंडिया 5.1-2.3 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात सोम डिस्टीलिरीज, टिनप्लेट, अबन ऑफशोर, टाटा स्पॉन्ज, एक्सेल क्रॉप 20-12 टक्क्यांनी वधारले.  सब्रोस, न्यूट्राप्लस इंडिया, व्हिडिओकॉन, ऑर्किड फार्मा, पिनकॉन स्पिरिट 5.5-4.8 टक्क्यांनी घसरले.