|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्री

पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्मयात बचावले आहेत. केबलच्या वायरमध्ये मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अडकण्याची शक्मयता निर्माण झाली होती पण वेळीत लक्षात आल्याने मुख्यमंत्री बचावले आहेत. यापूर्वीही लातूरमध्ये मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

एका कार्यक्रमासाठी जाताना हेलिकॉप्टर लँड होणार होते त्यावेळी दोन इमारतींच्या मधून हेलिकॉप्टर खाली येऊ लागले. पण तेवढय़ात दोन इमारतींच्या मधे लटकत असलेली केबलची वायर पायलटला दिसली. त्याने लगेचच पुन्हा हेलिकॉप्टरचे टेकऑफ केल्याने अनर्थ टळला.