|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बाजार समिती सभापतीपदी दिनकर पाटील

बाजार समिती सभापतीपदी दिनकर पाटील 

प्रतिनिधी /सांगली :

 सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची संधी अखेर मदन पाटील गटाला मिळाली आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथील दिनकर पाटील यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  बाजार समितीमध्ये सर्व गटांचे मनोमीलन झाले आहे. त्यामुळे माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाच्या तानाजी पाटील यांना उपसभापतीपदाची लॉटरी लागली. हे दोन्ही निर्णय माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी घेतले त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. या निवडीनंतर सभापती आणि उपसभापतीच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष करत मार्केट यार्डात फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून मार्केटयार्ड दणादणून सोडले.

 नवीन सभापतीपदाची निवडीची सभा सकाळी अकरा वाजता मार्केट यार्डातील बाजार समितीच्या मुख्यालयात मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तत्पुर्वी ही निवड बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षश्रेष्ठींची  माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्मिता बंगला येथे झाली. यामध्ये ही दोन्ही नावे अंतिम करण्यात आली. त्यानंतर बरोबर अकरा वाजता हे सर्व संचालक बाजार समितीमध्ये आले. सभापती पदासाठी दिनकर पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. याला सूचक म्हणून देयगोंडा बिरादार आणि अनुमोदक म्हणून प्रशांत शेजाळ यांनी सहय़ा केल्या. तर उपसभापतीपदासाठी कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर येथील तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून दीपक शिंदे यांनी तर अनुमोदक म्हणून जीवन पाटील यांनी सहय़ा केल्या. अर्ज भरण्याच्या मुदतीत फक्त दोघांचेच अर्ज दाखल झाले. 

Related posts: