|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहर भाजपामुळे मुख्यमंत्र्यांवर नामुष्की

शहर भाजपामुळे मुख्यमंत्र्यांवर नामुष्की 

प्रतिनिधी /सोलापूर :

काँग्रेसची 50 वर्षांची सत्ता उलथावून टाकत महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपच्या 51 नगरसेवकांमध्ये गेल्या 9 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादामुळे वैतागलेल्या मुख्यमंत्र्यांवर भाजपाच्या ताब्यातील महापालिका बरखास्तीचा इशारा देण्याची नामुष्की ओढावली आहे. दोन्ही मंत्र्यांसह नगरसेवकांना मुंबईत पाचारण करत वाद न करण्याची तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिल्याने पालिकेचा गाडा आता तरी सुरळीत चालणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपचे दोन्ही मंत्री देशमुख आणि 51 नगरसेवकांमधील वादाने अवघ्या नऊ महिन्यांच्या सत्तेतच भाजपाची अब्रू ताकतीने चव्हाटय़ावर आणल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक घ्यावी लागली. बुधवारी रात्री 11 वाजता झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोलापूरच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी केली. विशेष म्हणजे 51 नगरसेवकांना झापताना मुख्यमंत्र्यांचा रोख दोन्ही मंत्र्यांच्या दिशेनेच होता, अशीही चर्चा आहे. शहराचा विकास न करता आपसात भांडता ही अशोभणीयबाब असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली. वाद थांबवा अन्यथा भाजपच्या ताब्यातील महापालिका बरखास्त करु असा इशारा देण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवरच ओढावली. दोन्ही मंत्र्यांना कानमंत्र देताना पालकमंत्र्यांनी पालकाची भूमका निभवावी अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related posts: