|Thursday, December 13, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » यवतमाळमध्ये पार पडला समलैंगिक विवाहसोहळा

यवतमाळमध्ये पार पडला समलैंगिक विवाहसोहळा 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

यवतमाळमध्ये पहिल्यांदाच समलैंगिक विवाह पार पडला. शहरातील प्रसिद्ध पुस्तक विक्रत्येजा मुलगा काल इंडोनेशियाच्या आपल्या मित्राशी विवाहबद्ध झाला. यवतमाळमधील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळ पार पडल्याची माहिती मिळाली आहे.

या लग्नाची कुठेही चर्चा होऊ नये, यासाठी खास गुप्तता पाळण्यात आली होती. वराच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने मोजक्मयाच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. यवतमाळमधील प्रसिद्ध पुस्तक विपेत्याचा मुलगा अमेरिकेत नोकरीला आहे. त्याला तिथे बक्कळ पगाराची नोकरी आहे. अमेरिकेत वास्तव्य आणि मोठय़ पॅकेजची नोकरी असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीही एका पायावर तयार होते. परंतु, तो लग्नाला नकार देत असल्याने घरच्यांची काळजी वाढली होती. त्याला विचारले असता त्याने आपण समलैंगिक विवाह करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मूळचा इंडोनेशियन असलेल्या आपल्या सहकाऱयावर त्याचे प्रेम होते. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांनी नाईलाजास्तव लग्नास होकार दिला.

 

 

 

 

Related posts: