|Thursday, December 13, 2018
You are here: Home » leadingnews » लोकशाहीवर दूरगामी परिणाम : राहुल गांधी

लोकशाहीवर दूरगामी परिणाम : राहुल गांधी 

 

 दिल्ली/ प्रतिनिधी: 

न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घ्यायला लागणे लोकशाहीसाठी दुर्दैवी असून, याचा लोकशाहीवर दूरगामी परिणाम होण्याची भीती काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

सुप्रिम कोर्टाचे प्रशासन या दोन महिन्यांपासून नीट काम करीत नसून, न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकणार नाही, असे मत जे. चेलमेश्वर यांच्यासह चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राहुल म्हणाले, आजची ही घटना लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा लोकशाहीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. न्या. लोयांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 

Related posts: