|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » उद्योग » मोबाईल टॉवर नियमाबाबत राज्याचे सहकार्य नाहीः टीआईपीए

मोबाईल टॉवर नियमाबाबत राज्याचे सहकार्य नाहीः टीआईपीए 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दूरसंचार कंपन्यांना राज्यामध्ये मोबाईल टॉवर लावण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये विविध राज्यानूसार याचे नियम वेगळे असल्याने दूरसंचार मंत्रालयाच्या नियमाशी साधर्म्य नसल्याने अधिक अडचणी वाढल्या आहेत. भारतामध्ये केवळ हरियाणा, झारखंड, राज्यस्थान व ओडिशा या पाच राज्यांचेच नियम दूरसंचार विभागाच्या नियमाशी साधर्म्य साधतात, उर्वरीत 24 राज्यांमध्ये परिस्थिती कठीण होत आहे.

टॉवर ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर्स असोसिएशनचे महानिर्देशक तिलक राज हुआ ने वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले की, यामुळे मोबाईल टॉवर लावणे कठीण बनले असून याचा संबंधित कंपनीच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याबाबत विभागाने 2016 मध्ये काही नियम बनवले होते. यामध्ये तत्काळ टॉवर परवानगी, एक खिडकी योजना, संबंधित अधिकाऱयांना अधिकार, नियुक्त्या, प्रशासकीय फी अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता.

खासकरून गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रामध्ये अधिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या राज्यात अधिक टॉवर लावण्याची परवानगी मिळाली तर दूरसंचारची गुणवत्ता सुधारू शकते. राज्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास सरकारच्या डिजिटल इंडिया, स्मार्ट सीटी व आर्थिक समावेशनांचे कार्यक्रम यशस्वी होण्यास सहकार्य लाभेल. टीआईपीएच्या सदस्यांमध्ये भारती इन्फ्राटेल, एटीसी टावर्स, जीटीएल इन्फ्रास्टक्चर, रिलायंन्स इंन्फ्राटेल, इंडस टावर्स आणि विजन यांचा समावेश आहे.

Related posts: