|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्समध्ये 100 अंकांची तर निफ्टीत 34 अंकांची घट

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची तर निफ्टीत 34 अंकांची घट 

सेन्सेक्समध्ये 70 अंकांचा वधार : मेटल निर्देशांकात घसरण

वृत्तसंस्था / मुंबई

मुंबई शेअरबाजारासाठी शुक्रवारचा दिवस उतार-चढावाचा राहिला आहे. दिवसाची सुरुवात विक्रमी वाढीने झाली असली तरी दुपारच्या सत्रात निर्देशांकात अचानक मोठी घट दिसून आली. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांवर केलेल्या आरोपांचा परिणाम शेअरबाजारावरही दिसून आला. या पत्रकार परिषदेमुळे दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकांत 100 अंकांची घट झाली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही दिवसभरात पाच-सहा वेळा मोठे चढउतार पहावयास मिळाले. मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप शेअर निर्देशांक 0.2 टक्क्मयांनी घसरून 18,137 वर बंद झाला. मुंबई शेअरबाजाराच्या स्मॉलकॅप निर्देशांकात विशेष बदल दिसून आला नाही.

बँकिंग, वाहन, वित्तसेवा, प्रसारमाध्यमे, धातू, भांडवली वस्तू आणि तेल तसेच नैसर्गिक वायू आदी क्षेत्रातील समभागांच्या खरेदीमुळे निर्देशांकाला आधार मिळाला. बँक क्षेत्राचा निर्देशांक 0.3 टक्के वधारला. तर वाहन निर्देशांक 0.3 टक्के, वित्तसेवा निर्देशांक 0.4 टक्के, प्रसारमाध्यम निर्देशांक 1.7 टक्के, धातू निर्देशांक 0.6 टक्के अशी वाढ दिसून आली. भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 0.5 टक्के वधारला. तर तेल क्षेत्राच्या निर्देशांकात 0.7 टक्के वाढ दिसून आली. तथापि, एफएमसीजी, औषधनिर्मिती, बांधकाम, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रांच्या निर्देशांकांमध्ये घट झाल्यामुळे निर्देशांकावर दबाव वाढला होता.

मुंबई शेअरबाजाराच्या 30 समभागांच्या प्रमुख निर्देशांकात 89 अंकांची वाढ होऊन तो 34,592 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराच्या 50 समभागांच्या निफ्टी या निर्देशांकात 30 अंकांची वाढ होऊन तो 10,681.3 वर बंद झाला.

आयसीआयसीआय बँक, भारती इन्फ्रा, झी एंटरटेनमेंट, वेदांत, ओएनजीसी, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉ. रेड्डीज लॅब या कंपन्यांच्या समभागांमध्ये 0.7 ते 2.7 टक्क्मयांची वाढ झाली. तर युपीएल, अरदो फार्मा, ल्युपिन, भारती एअरटेल, बॉश, आयटीसी, बजाज ऑटो, विप्रो आणि सन फार्मा या कंपन्यांच्या समभागामध्ये 0.7 टक्के ते 1.4 टक्क्मयांची घसरण झाली.