|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » युग तुलीचा जामीन अर्ज फेटाळला

युग तुलीचा जामीन अर्ज फेटाळला 

प्रतिनिधी, मुंबई

कमला मिल जळीतकांडातील मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युग तुली याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान तुली यांच्यावतीने ऍड. श्याम दिवाणी यांनी बाजू मांडली. तुलीवर केलेले आरोप बिनबुडाचे असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुलीवर धूळफेक होत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. मात्र मोजोस पबमधील ज्वलनशील पदार्थांमुळेच आग वन अबव्हपर्यंत पसरली असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. यावलकर यांनी निर्णय राखून ठेवला होता. त्यावर शुक्रवारी न्यायालयाने सबळ पुराव्याखाली मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युग तुलीवरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

29 डिसेंबरला मध्यरात्री लागलेल्या आगीत 14 निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले होते. भीषण अग्नितांडवप्रकरणी अटक केलेल्या मोजोस बिस्ट्रो पबचा भागीदार युग पाठक आणि वन अबव्हचे संचालक कृपेश सिंघवी, जिगर संघवी, अभिजित मानकर यांना 17 जानेवारापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. युग तुली अद्याप फरारच आहे.

Related posts: