|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘पद्मावत’चा वाद चिघळला चित्रपटाच्या नामांतरानंतरही करणी सेनेचा विरोध कायम

‘पद्मावत’चा वाद चिघळला चित्रपटाच्या नामांतरानंतरही करणी सेनेचा विरोध कायम 

प्रतिनिधी, मुंबई

विविध राजपूत संघटना आणि करणी सेनेच्या तीव्र विरोधानंतर 1 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱया वादग्रस्त पद्मावती चित्रपटाचे नाव बदलून पद्मावत असे केल्यानंतर तो 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या नामांतरानंतरही राजपूत करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम राहिल्यामुळे हा वाद पुन्हा चिघळला आहे. मुंबईत गुरुवारी सेन्सॉर बोर्डाबाहेर निदर्शने करणाऱया राजपूत करणी सेनेच्या 96 कार्यकर्त्याना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन नंतर सोडण्यात आले.

संजय लीला भन्साळीचा पद्मावतला विरोध झाल्यानंतर त्याचे प्रदर्शन लांबणीवर टाकले होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. त्यांनी सिनेमामध्ये सुचवलेल्या पाच सुधारणा केल्यानंतर यूए प्रमाणपत्र दिल्यानंतर पद्मावती ऐवजी पद्मावत असे चित्रपटाचे नाव केले.

सेन्सॉर बोर्डाने पद्मावतला यूए प्रमाणित केल्यामुळे करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या निषेधार्थ करणीसेनेने सेन्सॉर बोर्डाबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

चित्रपटामध्ये राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृती मलीन केल्याचा आरोप संघटनांनी केल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होईल की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related posts: