|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » जीवनवाहिनी होणार गतिमान

जीवनवाहिनी होणार गतिमान 

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह उपनगरीय सेवा अधिक वेगवान आणि सुखकर होण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शुक्रवारी बैठक झाली. मेट्रोच्या नव्या प्रकल्पाला मान्यता तसेच उपनगरीय लोकलसेवेसह विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. मेट्रोचे विस्तारीकरण, स्थानकांच्या आधुनिकीकरणासह उन्नत मार्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.  

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो 4 प्रकल्पाचा वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुख पर्यंत (मेट्रो 4 अ) करण्यास मान्यता दिली आहे. कासारवडवली ते गायमुख या सुमारे 2.7 किमीच्या मार्गात दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मार्गासाठी सुमारे 949 कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गामुळे 2021 मध्ये दीड लाख प्रवासी प्रवास करणार असल्याचा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला. तसेच 2031 मध्ये ही प्रवासी क्षमता एकूण 13.44 लाख एवढी होणार आहे. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो 4 मार्ग 32.3 किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

एमयुटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात येणाऱया विविध रेल्वे प्रकल्पांचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेतला. उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेऊन ती कामे सुरू केली जातील, अशी ग्वाही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

शुक्रवारी सह्याद्री अतिथीगफहात झालेल्या एम़एमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो 4 अ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मुंबई शहराला जोडणाऱया राष्ट्रीय महामार्ग 8 हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वसई-भाईंदर खाडीवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश देण्यात यावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच भिवंडी परिसरातील ट्रान्सपोर्ट हब आणि लॉजिस्टिक पार्कचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱया डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी, यासाठी उत्पादक कंपन्यांबरोबर बोलणी करावी तसेच मोनोरेल्वेचा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचे प्रवासी भाडे हे मेट्रो रेल्वेच्या समकक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वडाळा येथील अधिसूचित क्षेत्रात मल्टिमॉडेल वाहतुकीवर आधारित विकास संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे रहिवासीबरोबरच वाणिज्यिक व करमणुकीचे पेंद्र बनविण्यात येणार आहे. या पेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच यावेळी मेट्रो मार्ग 2 ब च्या मंडाळे येथील डेपोच्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. संत गाडगे महाराज चौक-वडाळाöचेंबूर मोनोरेल मार्गाच्या सुधारित प्रवास भाडेदरास मान्यता दिली.

 

Related posts: