|Thursday, January 18, 2018
You are here: Home » क्रिडा » युकी प्रमुख ड्रॉच्या समीप

युकी प्रमुख ड्रॉच्या समीप 

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

भारताचा टेनिसपटू युकी भांब्री ऑस्टेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत प्रमुख डा च्या समीप पोहचला आहे. येत्या सोमवारपासून येथे ऑस्टेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

पुरुष एकेरीच्या प्रमुख डामध्ये स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या दुसऱया सामन्यात युकीने स्पेनच्या टेबर्नरचा  6-0, 6-2 असा पराभव करत तिसऱया आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 25 वर्षीय युकीने ही लढत 57 मिनिटात जिंकताना 54 गुण मिळविले युकीचा  पुढील फेरीतील सामना कॅनडाच्या पोलेनस्कीशी होणार आहे. हा शेवटचा सामना जिंकला तर युकी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या प्रमुख डामध्ये स्थान मिळवेल.

Related posts: