|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » क्रिडा » लेबेनॉनचा मोघारबी बागानशी करारबद्ध

लेबेनॉनचा मोघारबी बागानशी करारबद्ध 

वृतसंस्था/ कोलकाता

लेबेनॉनचा फुटबॉलपटू अक्रम मोघारबीला मोहन बागान फुटबॉल क्लबने 2017-18 च्या आय लिग फुटबॉल हंगामासाठी करारबद्ध केले आहे. या स्पर्धेच्या उर्वरीत कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे.

आय लिग स्पर्धेच्या गुणतक्त्यात बागान सध्या पाचव्या स्थानावर आहे.  2012-13 च्या आय लिग हंगामात मोघारबी चर्चिल ब्रदर्स संघाशी करारबद्ध झाला होता. आय लीग स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात मोहन बागानला मिर्नव्हा पंजाब एफसी संघाकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. बागानने या स्पर्धेत नऊ सामन्यातून 13 गुण मिळविले आहेत.

Related posts: