|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘चाटे’च्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड

‘चाटे’च्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

भास्करराचार्य प्रतिष्ठान  संचलित चाटे स्कूल अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असते. तसेच क्रीडा आणि कलामध्येदेखील अग्रेसर आहे. ऑल इंडिया शीतीकॉन कराटे दि असोसिएशन मार्फत घेण्यातआलेल्या जिल्हास्तरीय शीतीकॉन स्पर्धेमध्ये शाळेच्या  45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा नुकत्याच न्यू वाडदे, गडमुडशिंगी येथे पार पडल्या.

संपूर्ण जिल्हय़ातून स्पर्धेसाठी एकूण 388 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चाटे  स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 27 सुवर्ण, 10 कास्य, 7 रौप्य पदके मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. वैयक्तिक गटात पृथ्वीराज धनंजय शिंदे (इयत्ता 2 री) याने सिल्वर मेडल पटकाविले. त्याची गोवा येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय शीतीकॉन कराटे स्पर्धेसाठी निवड झाली.

या सर्व विद्यार्थ्यांना चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, शाळेचे प्राचार्य बी. एस. वडगावे, सौ.प्रज्ञा गिरी यांचे प्रोत्साहन मिळाले.  सौ. सुचेता केसरकर, सौ. उज्ज्वला गायकवाड, सौ. मृदुला लिंग्रज, यास्मिन शेख, सौ. मीनल काळे-पाटील व जे. के. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. मार्शल आर्ट कोच उमेश चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Related posts: