|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रशासनाकडूनच नियमांची पायमल्ली

प्रशासनाकडूनच नियमांची पायमल्ली 

प्रतिनिधी / सातारा

शहराचा मध्यभाग असलेल्या पोवईनाका या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक परिसरात जाहिरातींना प्रतिबंध आहे. असे फलक नगरपालिकेमार्फत लावण्यात आलेले आहेत. पोवई नाक्यावरील स्मारकाभोवती जाहिरातींना प्रतिबंध असून देखील विविध कार्यक्रमांचे फलेक्स तसेच पोलीस शाखेकडून हद्दपारीसारखे फ्लेक्स लावण्यात येतात.

स्मारकाभोवती फलकांना प्रतिबंध असूनही शासनाकडूनच या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

पोवईनाका हा शहराचा मध्यभाग असल्याने हा परिसर सतत गजबजलेला असतो. याठिकाणाहून लाखो वाहने तसेच नागरिक ये-जा करीत असतात. याठिकाणी अनेक फ्लेक्स लावले जातात. मात्र, पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. स्मारक परिसरात जाहीरातींना प्रतिबंध असतानादेखील या फ्लेक्सवर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच शहरात असे अनेक विनापरवाना फ्लेक्स लागले आहेत. पोवई नाक्यावरील हद्दपारीचा फ्लेक्स नगरपालिकेकडून परवाना घेवून लावण्यात आलेला आहे. तो स्मारक परिसरात येत असल्याने तो फ्लेक्स काढण्यात येईल.

Related posts: