|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोमांसप्रकरण भडकविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावरील पत्रकार गोव्यात

गोमांसप्रकरण भडकविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावरील पत्रकार गोव्यात 

प्रतिनिधी / पणजी

राज्यात गोमांस संदर्भातील वादावर तेल ओतून आग भडकविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावरील एका वृत्तवाहिनीचे सुमारे दहा – बारा पत्रकार मंडळी गोव्यात ठाण मांडून बसली असून त्यांनी गोव्यापेक्षा दिल्लीत साफसफाई करावी, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.

सचिवालयात पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांना अनौपचारिकपणे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोव्यात गोमांस तुटवडा नाही. बेकायदेशीर गोमांसाविरुद्ध सरकार कारवाई ही करणारच. मात्र कायदेशीर पद्धतीने येणाऱया गोमांस विरुद्ध कोणी गडबड केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे ते म्हणाले. वास्तविक हा काही विषय नाही परंतु दिल्लीस्थित एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे पत्रकार गोव्यात येऊन विनाकारण आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि आपल्याला ही माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील पशुकल्याण मंडळाचे काही एनजीओ गोव्यात येऊन नको ती मुक्ताफळे उधळीत आहेत. त्यांना हिंमत असेल त्यांनी दिल्लीत जाऊन तेथील बेकायदेशीर पणे चाललेल्या गोमांस विक्री बंद करुन दाखवावी.

कर्नाटकाला पाणी देण्याचा प्रश्नच नाही

एका प्रश्नाला जाब देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या पत्राचा काहीजण अकारण विपर्यास्त अर्थ काढून राज्यात वातावरण तापवण्याचे प्रयत्न करीत आहेत. आपण जे काही पत्र लिहिलेले आहे ते संबंधितांनी पुन्हा एका वाचून घ्यावे, अर्थ समजत नसेल तर आपल्याला विचारावे आणि आपण म्हादई लवादाच्या चौकटीत बसूनच कर्नाकटशी बोलणी करण्यास तयारी दर्शविली. याचा अर्थ कर्नाटकला पाणी देणे असा मुळीच होत नाही, असे ते पुढे म्हणाले. कर्नाटकने आपल्या विभागात म्हादई नदीवर वा बाजूला कोणतेही काम सुरु केल्यास गोवा सरकार गप्प बसणार नाही, यासंदर्भात आपण मुख्यसचिवांना आदेश देणार असे ते म्हणाले.