|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » न्यायालयीन अवमान याचिका सादर करणार

न्यायालयीन अवमान याचिका सादर करणार 

प्रतिनिधी / पणजी

म्हादई जलतंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात स्थगिती दिलेली असतानाही कर्नाटकाने कळसा प्रकल्पाच्या कामास प्रारंभ केला असून दि. 6 फेबुवारी 2018 पासून सुरु होणाऱया सुनावणीवेळी लवादाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल व न्यायालयीन अवमान याचिकाही सादर केली जाईल, असे गोव्याचे वकील तथा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी सांगितले.

कळसा नाल्यात बांध बांधण्याचे काम चालू झाले आहे. हा बांध पूर्ण झाल्यास गोव्याच्या दिशेने म्हादईचा एक थेंबही पुढे सरकणार नाही, असे ऍड. नाडकर्णी यांचे मत आहे.

या बांधाचे काम सुरु झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळताच आपण गोव्यातील जलस्रोत खात्यातील अधिकाऱयांना खडाडून जागे करून त्या ठिकाणी पाठवले. मडगांव येथील अभियंत्याचे पथक तात्काल तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता कालव्यातील बांधाचे काम अर्धे झाले असल्याचे दिसून आले. लवादाच्या आदेशाने पाणी वळवण्यापासून रोखण्यासाठी यापूर्वी बांध घालण्यात आला होता. या बांधामुळे पाणी म्हादई खोऱयातून मलप्रभा खोऱयात वळवण्यापासून रोखले जात होते. आता हे रोखलेले पाणी वळवण्यासाठी कर्नाटकाने नवा उपाय शोधून काढला असून कालव्यात तिरपा बांध घालून कृतिमरित्या तयार केलेल्या उताऱयावरून अडवलेले पाणी सोडून दिले जाणार आहे. नैसर्गिकरित्या तिथे नदीचे अस्तित्वच राहिले नसल्याने पाणी आपोआप मलप्रभेच्या दिशेने वळणार आहे, असे ते म्हणाले.

Related posts: